मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ

लग्नसराईचा मोसम असल्याने सोन्या-चांदीची खरेदी वाढू लागलीये. स्थानिक बाजारात मागणी वाढल्याने शनिवारी सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. 

Updated: Mar 4, 2017, 04:22 PM IST
मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ title=

नवी दिल्ली : लग्नसराईचा मोसम असल्याने सोन्या-चांदीची खरेदी वाढू लागलीये. स्थानिक बाजारात मागणी वाढल्याने शनिवारी सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. 

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत ३७५ रुपयांची वाढ होत ते प्रतितोळा ३०,१०० रुपयांवर पोहोचले. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही ४०० रुपयांची वाढ होत ते प्रतिकिलो ४३,१०० रुपयांवर पोहोचले. 

याआधी शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत २७५ रुपयांची घसरण होत हे दर २९,७२५ वर पोहोचले होते. मात्र खरेदीदारांकडून सोन्याची खरेदी वाढल्याने सोन्याचे दर पुन्हा वाढलेत. 

राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर अनुक्रमे ३०,१०० आणि २९,९५० रुपयांवर पोहोचलेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालीये. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर ०.२ टक्क्यांच्या वाढीसह १२३४.३० डॉलर प्रति औंसवर पोहोचले.