3600 करोडोंचा दंड… रिलायन्सला झटका

सरकारनं मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला (आरआयएल) तब्बल 3600 करोड रुपयांचा अतिरिक्त दंड ठोठावलाय.

Updated: Jul 15, 2014, 03:15 PM IST
3600 करोडोंचा दंड… रिलायन्सला झटका title=

नवी दिल्ली : सरकारनं मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला (आरआयएल) तब्बल 3600 करोड रुपयांचा अतिरिक्त दंड ठोठावलाय.

पूर्वेत्तर तटस्थित के जी बेसिन इथून ठेवलेल्या लक्ष्याहून कमी गॅस काढण्यासाठी रिलायन्सला 57 करोड 90 लाख डॉलर म्हणजेच 3600 करोड रुपयांचा अतिरिक्त दंड लावण्यात आलाय. म्हणजेच रिलायन्स आता एकूण 2.37 अरब डॉलरचा दंड भरणार आहे.

यापूर्वी, याच के जीडी-6 ब्लॉकमधून लक्ष्याहून कमी प्रमाणात गॅस मिळवला म्हणून रिलायन्सवर 1.797 अरबचा दंड ठोठावण्यात आला होता.

रिलायन्सवर कमी उत्पादनासाठी 2010-11 मेध्ये 45 करोड 70 लाख डॉलर तर 2011-12 मध्ये 54 करोड 80 लाख डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर 2012-13 मध्ये 79 करोड 20 लाख डॉलर इतका दंड लगावण्यात आला होता. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.