भोपाळ : 'आयआरसीटीसी'वर तिकीट बुक करतांना आता तुम्हाला तुमच्या पसंतीचं बर्थ आणि कोच निवडता येणार आहे. आयआरसीटीसीच्या ई-टिकटिंग वर ही सुविधा पुढील महिन्यापासून सुरू राहणार आहे.
या सेवेची सुरूवात 15 ऑगस्टपासून नवी दिल्लीपासून करण्यात येणार आहे. यात शताब्दी एक्सप्रेस सारख्या गाड्यांनी प्रवास करणारे प्रवासी आपल्या पसंतीची जागा निवडू शकणार आहेत.
काही प्रवाशांनी कोच बदलतांना अडचणी येतात. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग लोकांना त्रास होतो. इंजीनपासून शेवटच्या कोचपर्यंत जातांना हा त्रास होतो. नव्या योजनेत ही सुविधा देण्यात येणार आहे.
ऑनलाईन रेल्वे रिझर्व्हेशन देणारी साईट आयआरसीटीसी सध्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतेय. साईट अपग्रेडिंगही सुरू आहे. यामुळे साईटवर तीन पट वेगात तिकीट बुकिंग करता येत आहे.
नव्या सुविधेत प्रति मिनिट 7 हजार 200 ई-तिकीट मिळणार आहेत. आता सध्या प्रति मिनिट फक्त 2 हजार तिकीटं उपलब्ध होऊ शकतात. वेबसाईट अपग्रेड करण्यासाठी 100 कोटी खर्च करण्यात येणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.