स्वत:च्याच लग्नात नाचताना नवऱ्या मुलाचा मृत्यू

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो. मात्र या आनंदाच्या क्षणी अनपेक्षित असं काही घडावं ज्यामुळे रंगाचा बेरंग व्हावा. असंच काहीसं वडोदऱ्यात घडलंय.

Updated: May 12, 2017, 06:21 PM IST
स्वत:च्याच लग्नात नाचताना नवऱ्या मुलाचा मृत्यू title=

वडोदरा : लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो. मात्र या आनंदाच्या क्षणी अनपेक्षित असं काही घडावं ज्यामुळे रंगाचा बेरंग व्हावा. असंच काहीसं वडोदऱ्यात घडलंय.

स्वत:च्याच लग्नात नाचताना नवऱ्यामुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रनोली गावांत घडलीये. वरात नवऱ्या मुलीच्या घराच्या दिशेने निघाली होती. नवरा मुलगा एका वरातीच्या खांद्यावर बसून आनंदाने नाचत होता. 

मात्र नाचता नाचताच तो खांद्यावरुन कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार नवरा मुलगा लग्नाच्या वेळेस दारु प्यायला होता. त्यामुळे नाचताना तो एका बाजूला कलंडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, नवऱ्या मुलाच्या अचानक मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जातेय.