गुजरातमध्ये प्रत्येक घरात स्वच्छतागृहे बांधणार, हेल्पलाइन नंबर

Updated: Sep 22, 2014, 09:01 PM IST
गुजरातमध्ये प्रत्येक घरात स्वच्छतागृहे बांधणार, हेल्पलाइन नंबर  title=

 

अहमदाबाद : गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदी बेन पटेल यांनी वलसाड जिल्ह्यातील लोकांसाठी एक टोल फ्री नंबर सुरू केला आहे. याद्वारे प्रत्येक घराघरात स्वच्छतागृहे बांधण्यासाठी सरकारकडून मदत मिळेल.

वलसाडमधील कपरडा तालुक्यातील नानापोढा गावामध्ये या सेवेला सुरुवात केली आहे. त्यानंतर शासकीय जाहीरातीद्वारे लोकांमध्ये या योजने बदल जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याद्वारे आता वलसाड जिल्ह्यामधील कोणीही व्यक्ती या टोल फ्री नंबर 1800-200-1004 वर कॉल करून घरातील स्वच्छतागृहे बांधण्यासाठी सरकारकडून मदत मागू शकतात.

या टोल फ्री नंबरची सुरुवात करताना पटेल यांनी स्वच्छतागृहे निर्माण करण्यासाठी पाच कोटी रुपये दान करणाऱ्या वलसाड आणि वापी शहरच्या जवळपासच्या स्वयंसेवी संस्था आणि औद्योगिक व्यक्तींचं अभिनंदन केलंय.   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.