युतीबाबत उद्धव ठाकरेंशी अमित शहांची फोनवर चर्चा

शिवसेना-भाजप युती तुटत असतांनाच  भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. शहा यांनी  उद्धव यांना युती टिकवण्याचं आवाहन केले आहे.

Updated: Sep 22, 2014, 11:29 AM IST
युतीबाबत उद्धव ठाकरेंशी अमित शहांची फोनवर चर्चा title=

नवी दिल्ली : शिवसेना-भाजप युती तुटत असतांनाच  भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. शहा यांनी  उद्धव यांना युती टिकवण्याचं आवाहन केले आहे.

शिवसेना ज्या 59 जागांवर निवडणूक जिंकू शकलेली  नाही, त्या जागांबाबत शिवसेनेनं विचार करावा. भाजप 19 जागांबाबत विचार करेल, असं अमित शहांनी उद्धव ठाकरेंना सांगितलयं. दरम्यान, युतीबाबत उद्धव ठाकरेंचा निर्णय हा त्यांनी स्पष्ट केला असून त्यापुढे अजून किती वाट पाहायची, असं शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी सांगितले.

शिवसेना-भाजपची जवळपास संपुष्टात आलीय. केवळ घोषणा बाकी आहे. दिल्लीमध्ये भाजपच्या निवडणूक संसदीय बोर्डाची बैठक झाली. यावेळी शिवसेनेने दिलेल्या जागांच्या प्रस्तावावर चर्चा झाली. शिवसेनेनं दिलेला प्रस्ताव नाकारण्यात आला. आज महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी ओम माथूर पुन्हा उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते, पण माथूर यांची भेट रद्द झाली असून त्यांच्याऐवजी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे उध्दव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

दरम्यान राज्यातील भाजप नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. या महत्वाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, अनंतकुमार, सुषमा स्वराज, राजीव प्रताप रुडी, ओम माथूर उपस्थित होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.