www.24taas.com, वृत्तसंस्था, हैदराबाद
आंध्र प्रदेशात घरात दहशतवादी घुसल्याने घबराट पसरली आहे. आंध्र प्रदेशच्या चित्तूरमध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. इथल्या एका घरात २-३ दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या घराला घेरलं आहे.
चित्तूर जिल्ह्यातील एका घरात दहशतवादी घुसले आहेत. सुरक्षा रक्षकांनी या घराला वेढा दिला आहे. दहशतवादी आणि पोलिसांत चकमक सुरू आहे. यामध्ये तीन पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, पोलिसांनी तामिळनाडू सीमेवर फकरुद्दीन या अतिरेक्याला अटक केली आहे. फकरुद्दीनच्या नेतृत्वाखालीच चित्तूर जिल्ह्यातील पत्तूरमध्ये छापा टाकण्यात आला. येथील एका घरात तीन दहशतावादी लपल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
अतिरेकी घुसलेल्या घराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच सीआरपीएफलाही पाचारण करण्यात आलं आहे. हे अतिरेकी भाजप नेत्याच्या हत्ये प्रकरणातील आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.