नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडली. यासाठी साळवे यांनी केवळ एक रुपया नाममात्र शुल्क आकारलं अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर दिलीय.
कुलभूषण जाधव यांची आंतरराष्ट्रीय कोर्टात बाजू मांडण्यासाठी साळवे यांनी किती फी घेतली असा प्रश्न एका युजरनं स्वराज यांना ट्विटर विचारला होता. हरीश साळवे यांच्याऐवजी एखादा दुसरा वकीलही जाधव यांचा युक्तीवाद मांडू शकला असता तेही साळवे यांच्यापेक्षा कमी शुल्क घेऊन असं या ट्विटर युजरनं म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना स्वराज यांनी हे खरं नाही.
साळवे यांनी या खटल्यासाठी अवघे एक रुपया शुल्क घेतल्याचा खुलासा स्वराज यांनी केलाय. हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या वतीने हरीश साळवे यांनी जाधव यांची बाजू मांडली. त्यांनी अनेक उदाहरणे देत पाकिस्तानचा खोटपणा न्यायालयासमोर उघड केलाय.