हीरो मोटोकॉर्पकडून वाहनांच्या किंमतीत २,२०० रुपयांपर्यंत वाढ

देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहन कंपनी हीरो मोटोकॉर्पने आपल्या दुचाकींच्या किंमतीत ५०० ते २,२०० रुपयांपर्यंत वाढ केलीये.

Updated: May 2, 2017, 10:38 AM IST
हीरो मोटोकॉर्पकडून वाहनांच्या किंमतीत २,२०० रुपयांपर्यंत वाढ  title=

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहन कंपनी हीरो मोटोकॉर्पने आपल्या दुचाकींच्या किंमतीत ५०० ते २,२०० रुपयांपर्यंत वाढ केलीये.

एक मेपासून कंपनीने आपल्या दुचाकींच्या किंमतीत ५०० ते २२०० रुपयापर्यंत वाढ कऱण्यात येत असल्याने कंपनीने स्पष्ट केलेय. 

दरम्यान, हीरो मोटोकॉर्पने गाड्यांच्या किंमतीत वाढीची घोषणा केल्यानंतर इतर दुचाकी कंपन्याही त्यांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकतात. 

हीरो मोटोकॉर्प सुरुवातीच्या श्रेणीमधील एचएफ डॉनपासून ते करिझ्मा झेडएमआर या वाहनांची विक्री करते. यांच्या किंमती ४० हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत आहे. 

एप्रिलमध्ये हीरी मोटोकॉर्पच्या सेल्समध्ये घसरण झाली होती. कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये ३.४९ टक्के घसरण झाली होती.