मृत महिलेवर तीन दिवस उपचार, हॉस्पिटलचं गौडबंगाल उघड

 अक्षय कुमारच्या 'गब्बर' चित्रपटात ज्याप्रमाणे एका मृत व्यक्तीवर उपचार करून त्याला लाखो रुपयांचं बिल दिलं जातं. तसा काहीसा प्रकार आंध्र प्रदेशातली कुरनूल येथील ओमिनी हॉस्पिटलमध्ये घडली आहे. एका मृत महिलेवर तीन दिवस उपचार केले आणि सुमारे १ लाख १० हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर  आला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी विजया मोहन यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. 

Updated: Aug 31, 2015, 03:30 PM IST
मृत महिलेवर तीन दिवस उपचार, हॉस्पिटलचं गौडबंगाल उघड title=

कुरनूल :  अक्षय कुमारच्या 'गब्बर' चित्रपटात ज्याप्रमाणे एका मृत व्यक्तीवर उपचार करून त्याला लाखो रुपयांचं बिल दिलं जातं. तसा काहीसा प्रकार आंध्र प्रदेशातली कुरनूल येथील ओमिनी हॉस्पिटलमध्ये घडली आहे. एका मृत महिलेवर तीन दिवस उपचार केले आणि सुमारे १ लाख १० हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर  आला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी विजया मोहन यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. 

कुरनूल येथील बुधवार पेठ येथे असलेल्या हॉस्पिटला जिल्हाधिकारी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, कुरनूलचे विभागीय महसूल अधिकारी यांनी भेट दिली. तसेच यांच्या चौकशीचे आदेश दिला. सुवर्थम्मा या महिलेचे रस्ते अपघातात मृत्यू झाला, पण तिच्यावर उपचार करण्यात आला असे ए. चेन्नाह या महिलेच्या भावाने तक्रार दाखल केली होती. 

महिला विवाहित होती तिला सहा महिन्यांची मुलगी आहे. महिला पतीसह मोटारसायकलीवरून जात होती. त्यावेळी अपघातात ती कोसळली. त्यानंतर तिला ओमिनी हॉस्पिटलमध्ये आयसीयूत ठेवण्यात आले. तीन दिवसानंतर तीला जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले. तीची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले. पण तिचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.