मुंबई : या महिन्याची तुमची काही बँकेशी निगडीत काही कामं राहिली असतील तर तातडीने पूर्ण करा... कारण उद्या म्हणजे 28 मार्च ते 5 एप्रिल अशा तब्बल नऊ दिवस बँका बंद राहणार आहेत.
या महिन्याची आपली बँकींगची कामं लवकरात लवकर संपवून टाका नाहीतर कॅश ट्रांसॅक्शन, चेक क्लिअरन्स, ड्राफ्ट बनवण्यापासून अनेक कामं 28 मार्चनंतर 5 एप्रिलपर्यंत रखडण्याची शक्यता आहे.
30 मार्च आणि 4 एप्रिल या दोन दिवशी बँका अर्धा दिवस उघड्या राहतील. मात्र, सलग सुट्ट्या आल्यानं या दिवशी बँकांमध्ये साहजिकच प्रचंड गर्दी उसळण्याची शक्यता आहे. सलग आलेल्या सुट्ट्या आणि आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे असणारं बँकांचं काम यामुळे बँका बंद राहणार आहेत.
विशेष म्हणजे या दिवसांत एटीएमद्वारे पैसे काढणाऱ्यांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागेल अशी शक्यता आहे. यावर उपाययोजना करणार असल्याचं बँक अधिकारी सांगत आहेत. तसंच 28 मार्चला भरलेला चेक क्लिअर व्हायलाही 6 एप्रिल उजाडू शकतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.