हैदराबाद येथे एअर कुलरच्या गोदाम आगीत सहा कामगारांचा मृत्यू

हैदराबादमध्ये अट्टापूर भागात एअर कुलरच्या गोदामात लागलेल्या आगीत सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 22, 2017, 11:39 AM IST
हैदराबाद येथे एअर कुलरच्या गोदाम आगीत सहा कामगारांचा मृत्यू title=

तामिळनाडू : हैदराबादमध्ये  अट्टापूर भागात एअर कुलरच्या गोदामात लागलेल्या आगीत सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. आगीचे कारण स्पष्ट झालेलं नाही.. मृत्यू पावलेले सहाही कर्मचारी छत्तीसगड आणि बिहारचे रहिवासी होते, हे गोदाम रहिवासी भागात होते.

सकाळी पाच सुमारास अग्निशमन दलाला आगीविषयी माहिती मिळाली. तातडीने अग्निशमन जवान घटनस्थळी पोहोचले. पण त्याआधीच सहा जण होरपळले होते. या सर्वांचे मृतदेह आगीतून बाहेर काढल्यावर शवविच्छदेनासाठी पाठण्यात आले. प्राथमिक तपासात आगीपासून संरक्षणाचे कुठलेही उपाय या गोदामाच्या मालकानं योजले नसल्याचं पुढे आले आहे.