`वडेरा-डीएलएफ` व्यवहार : अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

रॉबर्ट वडेरा आणि डीएलएफ यांच्यामध्ये झालेल्या डीलच्या चौकशीचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याची आज तडकाफडकी बदली करण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 16, 2012, 11:13 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
रॉबर्ट वडेरा आणि डीएलएफ यांच्यामध्ये झालेल्या डीलच्या चौकशीचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याची आज तडकाफडकी बदली करण्यात आलीय. जमीन व्यवहारांचे रेकॉर्ड ठेवणाऱ्या स्वच्छ चारित्र्याचे म्हणून ओळखल्या जाणारे अधिकारी अशोक खेमका यांनी या व्यवहारांच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर काही तास उलटले न उलटले तोच त्यांची बदली करण्यात आलीय.
काँग्रेस अध्यक्ष आणि यूपीएच्या चेअरमन सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा आणि रिअल इस्टेट कंपनी डीएलएफ यांच्यात ५८ करोड रुपयांचा जमीन व्यवहार झाले होते. या व्यवहारांत घोळ असल्याचा आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यानंतर आयएएस ऑफिसर अशोक खेमका यांनी या व्यवहाराचं म्युटेशन रद्द करण्याचे आदेश दिले होते. पण, चौकशी सुरू होण्यापूर्वी आणि कोणतीही कारवाई होण्यापूर्वीच काही दिवसांपूर्वी खेमका यांच्या हातात बदलीचे ऑर्डर पडलेत.
प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वडेरा यांनी ३.५३१ एकर जमीन रियल इस्टेट कंपनी डीएलएफला विकली होती. अशोक खेमका यांना डीएलएफ आणि वडेरा यांची कंपनी ‘स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.’ यांच्यात झालेल्या व्यवहारांमध्ये बरीच अनिमितता आढळली होती. यानंतर त्यांनी या व्यवहाराचं म्युटेशन रद्द करण्याचे आदेश दिले होते. या व्यवहारांच्या कागदपत्रांवर अनधिकृत अधिकाऱ्यांची सही खेमका यांना आढळली होती.