मदुरई : तामिळनाडूच्या मदुरई जिल्ह्यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोत एक व्यक्ती स्मशानभूमीत एका बाकावर झोपलाय. या व्यक्ती तामिळनाडूचा केडर आयएएस ऑफिसर यू सहायम आहे.
या आयएएस अधिकारी 1990 मध्ये दफन करण्यात आलेल्या प्रेताचा संरक्षण करतोय, कारण त्या प्रेताची कुणीही छेडछाड करू नये असं त्यांचं म्हणणं आहे.
आयएएस सहायम यांना माहिती मिळाली आहे की, एका व्यक्तीला मारून येथे दफन करण्यात आलं आहे. गावातील लोकांच्या मते येथे मिळालेली हाडं त्यांच्या नातेवाईकाची आहेत. डीएनए टेस्टसाठी ही हाडं चेन्नईला पाठवण्यात आली.
कुणीही पुरावे नष्ट करू नयेत म्हणून सहायम यांनी हा पहारा दिला आहे. सहायम हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, त्यांचं कायद्याप्रमाणे वागणं अनेक राजकीय नेत्यांना खटकतं, त्यांची 20 वर्षात 20 वेळा बदली झाली आहे.
तामिळनाडूत निवडणूक काळात सहायम यांनी असं काही काम केलं की, करूणानिधी यांनी सहायम यांच्यावर आणीबाणी लावल्याचा आरोप केला. सहायम यांनी मतदारांना पैसे वाटण्याची उमेदवारांचा कट उधळून लावला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.