अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्ताच्या घरी छापे

नोटबंदीची घोषणा झाल्यानंतर काळापैसा बाळगणाऱ्यांच्या घरी छापे मारले जात आहेत. देशभरात आयकर विभागाचे छापे सुरु आहेत. आंध्र प्रदेशमध्ये आयकर विभागाने अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त लक्ष्मण भास्कर यांच्या घरी छापा मारला.

Updated: Dec 18, 2016, 08:50 PM IST
अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्ताच्या घरी छापे title=

हैदराबाद : नोटबंदीची घोषणा झाल्यानंतर काळापैसा बाळगणाऱ्यांच्या घरी छापे मारले जात आहेत. देशभरात आयकर विभागाचे छापे सुरु आहेत. आंध्र प्रदेशमध्ये आयकर विभागाने अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त लक्ष्मण भास्कर यांच्या घरी छापा मारला.

छापेमारीमध्ये आयकर विभागाला लक्ष्मण भास्कर यांच्या घरी ३० कोटींची संपत्ती मिळाली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. लक्ष्मण यांच्या घरातून आयकर विभागाने महत्त्वाचे कागदपत्र आणि २ हजाराच्या नव्या नोटांची ७ लाखांची रोकड जप्त केली आहे. 

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री लक्ष्मण भास्कर यांच्या निवासस्थानी छापे मारले. 2 फ्लॅट, 9 प्लॉट, 4.5 एकर जमिनीचे कागदपत्र त्यांच्या घरी सापडले. सोबतच महागडी दारु आणि ७ मोबाईल देखील सापडले.