देशाच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ

देशातील परकीय चलन साठ्यात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आलीय. परकीय चलन साठा ४८.३२ कोटी रुपयांहून ३५२.०९८७ अरब डॉलरवर पोहचला आहे.

Updated: Dec 12, 2015, 07:39 PM IST
देशाच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ title=

मुंबई : देशातील परकीय चलन साठ्यात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आलीय. परकीय चलन साठा ४८.३२ कोटी रुपयांहून ३५२.०९८७ अरब डॉलरवर पोहचला आहे.

शिखऱ बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने मागील आठवड्यात विदेशी चलनाच्या साठ्यात मोठी वाढ झाल्याचं म्हटलंय. देशातील एसडीआरच्या मूल्यातही मोठी वाढ झाली आहे. एसडीआर मूल्य ३.८१ कोटी डॉलरहून ४.००६३ अरब डॉलरवर पोहोचलं आहे. 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) मध्ये जमा असलेल्या देशाच्या निधीतही वाढ झाली आहे.  ती १.२३ कोटी डॉलर वरून १.२९८८ कोटी डॉलरवर पोहोचली आहे.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.