पणजी : फेसबुकवर एका तरुणीचे बनावट अकाउंट बनवून तिची बदनामी करणाऱ्या महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील युवकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीये.
पोंडा पोलिसांनी भारतीय दंड विधानानुसार विविध कलमांखाली कोल्हापूरच्या 21 वर्षीय पांडुरंग तेजामविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेय. कोल्हापूरच्या चांदगड येथील तो रहिवासी आहे.
पिडीत तरुणी गोव्याची रहिवासी आहे. पांडुरंगने सोशल नेटवर्किंग साईटवरुन आपले फोटो अपलोड केल्याची तक्रार या तरुणीने दाखल केलीये. तसेच बनावट अकाउंटद्वारे तिच्या मित्रांशी तसेच नातेवाईकांशीही चॅटिंग करण्याचा प्रयत्न केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटलेय.
दरम्यान, या प्रकरणी अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून पोलिसांचा तपास सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.