दुचाकी वाहनांच्या विक्रीत भारताने चीनला टाकले मागे

दुचाकी वाहनांच्या विक्रीत भारतानं शेजारील देश चीनला मागे टाकलयं... 

Updated: May 7, 2017, 10:44 PM IST
दुचाकी वाहनांच्या विक्रीत भारताने चीनला टाकले मागे title=

नवी दिल्ली : दुचाकी वाहनांच्या विक्रीत भारतानं शेजारील देश चीनला मागे टाकलयं... 

गेल्या वर्षात भारतात सुमारे एक कोटी 80 लाख म्हणजे दिवसाला साधारण 48,000 दुचाकींची विक्री झाली आहे...तर चीनमध्ये गेल्यावर्षी साधारणतः 1कोटी60 लाख वाहन विक्री झाल्याचं एका अहवालात म्हणटलं आहे... 

महिलांनी दुचाकी वाहनं चालविण्यास दिलेली पसंती हे या वाढलेल्या विक्रीमागचं प्रमुख कारण आहे... रोजच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी महिला दुचाकीवरून प्रवास करण्यास पसंती देत असल्याचं दिसून येतयं... 

चीनचा साधारण 2कोटी दुचाकी विक्रीचा आकडा 1कोटी 60 लाखांवर आलायं... चीनमध्ये चारचाकी गाड्यांची मागणी वाढल्यानं दुचाकी विक्रीवर परिणाम झाल्याचं अहवालात म्हटलय..