हैदराबाद : आंध्र प्रदेशात भारतातील पहिली पेपरलेस कॅबिनेट घेण्यात आली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी सोमवारी ई-कॅबिनेट बैठक घेतली. कागदपत्रांचा वापर न करता झालेली ही पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक ठरली.
अजेंडा आणि महत्वाच्या मुद्यांवरील संभाषण हे रेकॉर्ड करण्यात आलं. महत्वाच्या मुद्यांवर होणाऱ्या चर्चेला पावर पॉईंट प्रझेंटेशनचीही मदत घेण्यात आली. फाईल शेअर करण्यासाठी नवी पद्धत वापरण्यात आली आहे. यासाठी 'फाईल फ्लाउड' वापरण्यात आलं, याव्दारे मंत्री, आणि अधिकाऱ्यांमध्ये फाईल शेअर होतील.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांचा आंध्र प्रदेश हे पहिलं डिजिटल कारभाराचं राज्य बनवण्यावर भर आहे.
ही पेपरलेस कॅबिनेट मिटिंग ज्या कॅबिनेटला ई-कॅबिनेट म्हटलं जातंय, त्यातील डाटा पासवर्ड-सुरक्षित ठेवण्यात आले आहेत, तसेच ते इतर कुणालाही दिले जाणार नाहीत. इलेक्टॉनिक फाईल शेअरिंगसाठी फाईल शेअर सिस्टीम फाईल क्लाऊड टूल वापरण्यात आलं.
ई-कॅबिनेट अॅपची सर्वांना माहित व्हावं, तसेच ते लॉगईन कसं करता येईल, इलेक्ट्रॉनिक फाईल शेअर कसं असेल, हे आधी शिकवण्यात आलं. मात्र मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या शेजारी बसलेल्या काही मंत्रीच टेक्वो सेव्ही असल्याचं दिसलं, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री परितला सुनीता यांना इलेक्ट्रॉनिक फाईल पाहण्यासाठी मध्येच मदत घ्यावी लागली.
देलगू देसम पक्षाच्या सरकारला ८ सप्टेंबर रोजी शंभर दिवस पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर पहिली कॅबिनेट बैठक ही पेपरलेस घेण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.