धक्कादायक: ‘ग्लुकॉन डी’मध्ये सापडल्या अळ्या

नेस्लेच्या मॅगीमध्ये हानीकारक पदार्थ अतिप्रमाणात आढळल्यानंतर आता ‘ग्लुकॉन डी’ या प्रसिद्ध एनर्जी ड्रिंकच्या पॅकेटमध्ये अळ्या सापडल्यानं खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंद शहर जिल्ह्यात ‘ग्लुकॉन डी’च्या पावडरमध्ये अळ्या सापडल्या आहेत. 

PTI | Updated: Jun 9, 2015, 06:01 PM IST
धक्कादायक: ‘ग्लुकॉन डी’मध्ये सापडल्या अळ्या title=

लखनऊ: नेस्लेच्या मॅगीमध्ये हानीकारक पदार्थ अतिप्रमाणात आढळल्यानंतर आता ‘ग्लुकॉन डी’ या प्रसिद्ध एनर्जी ड्रिंकच्या पॅकेटमध्ये अळ्या सापडल्यानं खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंद शहर जिल्ह्यात ‘ग्लुकॉन डी’च्या पावडरमध्ये अळ्या सापडल्या आहेत. 

बुलंद शहरममधील ममसा गावात राहणार्‍या बबलूनं औषधाच्या दुकानातून ग्लुकॉन डीची पाकिटं विकत घेतली होती. ही ग्लुकॉन डी प्यायल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सर्वांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. याबाबत त्यानं अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली. 

बबलूच्या तक्रारीनंतर आम्ही वेगवेगळ्या दुकानांतून ग्लुकॉन डीची चार पाकिटं विकत घेतली तर आम्हाला त्या पाकिटांमधील पावडरमध्ये अळ्या सापडल्या. सध्या आम्ही आणखी काही पाकिटं तपासणीसाठी पाठविली असून याबाबत अहवाल आल्यानंतर ग्लुकॉन डीच्या कंपनीवर कारवाई करण्यात येईल असं, अन्न व औषध विभागाचे अधिकारी शिवादास यांनी सांगितलंय. अमेरिकेतील जायट एच. जे. हेन्झ ही अमेरिकन कंपनी ग्लुकॉन डी बनविते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.