भारताच्याच 'कुपुत्रा'नं दिली भारताला धमकी - एनआयए

'आयसिस'मध्ये सामील झालेल्या कल्याणमधल्या चारपैकी फहाद शेख या तरूणाने भारताविरूद्ध युद्ध पुकारलं आहे. 

Updated: Nov 25, 2015, 10:09 AM IST
भारताच्याच 'कुपुत्रा'नं दिली भारताला धमकी - एनआयए title=

कल्याण : 'आयसिस'मध्ये सामील झालेल्या कल्याणमधल्या चारपैकी फहाद शेख या तरूणाने भारताविरूद्ध युद्ध पुकारलं आहे. 

आयसिसच्या माध्यमातून फहाद शेखने भारताला ही धमकी दिल्याची माहिती एनआयएनं सोमवारी मुंबईत विशेष न्यायालयात दिली. 

शिवाय याच चार तरूणांपैकी शाहीद तांकी या तरूणाचा आयसिससाठी दहशतावादी कारवाया करताना मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तसा अहवाल एनआयएनं न्यायालयात सादर केलाय.

कल्याणचे फहाद तनवीर शेख, अरिब फयाझ माजिद, अमन नईम तांडेल, शाहिम फारुक तांकी हे चार तरुण दहशतवादी संघटना इसिसमध्ये सहभागी झाले होते. त्यापैंकी अरिब माजिद हा तरुण परत आला असून तो सध्या राष्ट्रीय तपास संस्था ( एनआयए) च्या ताब्यात आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.