जम्मू-काश्‍मिरात ७०, झारखंडमध्ये ६१.९२ टक्के मतदान

जम्मू- काश्मीर विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील १५ जागांसाठी ७० टक्के मतदान तर झारखंडमध्ये ६१.९२ टक्के झाल्याची माहिती निवडणूक आयोगाचे उमेश सिन्हा यांनी दिली.  

PTI | Updated: Nov 25, 2014, 07:07 PM IST
जम्मू-काश्‍मिरात ७०, झारखंडमध्ये ६१.९२ टक्के मतदान title=

श्रीनगर, रांची : जम्मू- काश्मीर विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील १५ जागांसाठी ७० टक्के मतदान तर झारखंडमध्ये ६१.९२ टक्के झाल्याची माहिती निवडणूक आयोगाचे उमेश सिन्हा यांनी दिली.

दहशतवादी हल्ल्याची भीती आणि थंडीचा सामना करत जम्मू-काश्‍मीर मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. तर नक्षली भागाचे वर्चस्व झुगारुन झारखंडमध्ये विक्रमी मतदान झाले.

जम्मू- काश्मीरमध्ये काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता सकाळपासून कडक बंदोबस्तात शांततापूर्ण वातावरणात मतदान सुरु होते. काही केंद्रांवर मतदानासाठी मतदारांच्या रांगा दिसत होत्या.

डोडा मतदारसंघात ७६ टक्के तर, कारगिल ५९ टक्के, लेह ५७ टक्के, किश्तवर ७० टक्के, गंदेरबल६८ टक्के, बांदिपोरे ७०.३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. २००८ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ६० टक्के मतदान झाले होते.

दरम्यान, बांदिपोरे आणि नैदाखी परिसरातून दोन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे ग्रेनाईड सापडले आहेत. त्यांनी मतदान केंद्रापासून काही अंतरावर स्फोटाच्या उद्देशाने ग्रेनाईड पेरले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.