'बीएसएफ'च्या अधिकाऱ्याची जवानाकडून हत्या

केरळमध्ये बीएसएफच्या अधिकाऱ्याची एका जवानाने गोळ्या घालून हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

Updated: May 13, 2016, 10:04 PM IST
'बीएसएफ'च्या अधिकाऱ्याची जवानाकडून हत्या title=

वतकारा : केरळमध्ये बीएसएफच्या अधिकाऱ्याची एका जवानाने गोळ्या घालून हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'राज्यात 16 मे रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सुरक्षेसाठी 'बीएसएफ'चे जवान दाखल झाले आहेत.

राजस्थानचे ४५ वर्षीय निरीक्षक राम गोपाल मिना यांच्याकडे उमेश प्रसाद सिंगने सुटी मागितली होती. 

सुटीवरून दोघांमध्ये भांडण झालं, दरम्यान उमेशने रायफलमधून राम यांच्यावर गोळीबार केला. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. उपचारापूर्वीच राम यांचं निधन झालं.