जयललितांना हृदयविकाराचा झटका

तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.

Updated: Dec 4, 2016, 10:01 PM IST
जयललितांना हृदयविकाराचा झटका  title=

चेन्नई : तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. अपोलो हॉस्पिटलच्या सीसीयूमध्ये जयललितांना हलवण्यात आलं आहे. सप्टेंबर महिन्यापासून जयललिता या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. कार्डिओलॉजिस्टची टीम जयललितांवर सध्या उपचार करत आहे.

दरम्यान चेन्नईतल्या अपोलो हॉस्पिटलबाहेर एआयडीएमकेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. तामीळनाडूचे राज्यपाल चेन्नईकडे रवाना झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी फोनवरून जयललितांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. 73 दिवसांपासून जयललिता हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.