www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा अण्णा द्रमुक पक्ष पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. जयललिता उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
त्यावेळी अण्णा द्रमुकच्या एनडीएमधील समावेशाबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. 1999 मध्ये जयललिता एनडीएमधून बाहेर पडल्या होत्या. जयललिता आणि मोदी यांच्यात चांगले संबंध असले तरी मोदींच्या शपथविधी सोहळ्याला त्या गैरहजर राहिल्या होत्या.
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांना शपथविधीसाठी बोलावल्यानं जयललिता नाराज झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, केंद्रातील सत्ताधारी भाजपप्रणित एनडीएकडे लोकसभेमध्ये पूर्ण बहुमत असले तरी राज्यसभेत पुरेसे बहुमत नाही. त्यामुळे राज्यसभेत महत्त्वाची विधेयके संमत करण्यासाठी भाजप सरकारला बिगर काँग्रेसी पक्षांची मदत लागणार आहे.
त्यादृष्टीने अण्णाद्रमुकचा एनडीएमधील प्रवेश महत्त्वाचा मानला जातोय. राज्यसभेत अण्णाद्रमुकचे 10 खासदार आहेत. या पाठिंब्याच्या बदल्यात केंद्र सरकार तामिळनाडूसाठी विशेष आर्थिक मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जयललिता उद्या पंतप्रधान मोदींसह केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचीही भेट घेणार असल्याचं समजतं....
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.