www.24taas.com,नवी दिल्ली
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि ‘प्रेस काऊंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मार्कंडेय काटजू आणि भाजप नेते अरूण जेटली यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक झडली. काटजू यांनी लिहिलेला एक लेख याला कारणीभूत ठरलाय.
मार्कंडेय काटजू यांनी लिहिलेल्या लेखात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमरांवर टीका केली आहे. `गोध्रामध्ये काय घडलं याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे आणि 2002च्या दंगलींमध्ये मोदींचा हात नसल्याचं मान्य करणं कठीण आहे`, असं काटजू यांनी लिहिलंय.
यावर भाजपमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. `निवृत्तीनंतर काम मिळवून देणाऱ्या काँग्रेसबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रकार आहे` असं जेटली म्हणाले. इतक्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीनं असं राजकीय भाष्य करणं अनुचित असल्याचं सांगत भाजपनं त्यांच्या पदाचा राजीनामा मागितला आहे.