www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसचे खासदार कमलनाथ यांनी लोकसभेचे तात्पुरत्या स्वरुपातील अध्यक्ष म्हणून बुधवारी शपथ घेतली. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
कमलनाथ लोकसभेचे सर्वात जेष्ठ खासदार आहेत. ते सलग नवव्या वेळेस लोकसभा निवडणुकीतून निवडून आलेत. सोळाव्या लोकसभा निवडणुकीत ते मध्यप्रदेशच्या छिंदवाडा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेत. कमलनाथ इतर सर्व नवनिर्वाचित खासदारांना 5 आणि 6 जून रोजी शपथ देतील.
गेल्यावेळी, सरकारमध्ये कमलनाथ यांनी शहरी विकास तसंच संसदीय कारभार हाताळला होता. बहुतेकदा जास्तीत जास्त वेळा सभागृहातील सदस्य म्हणून निवड झालेल्या सदस्याला ‘प्रोटेम स्पीकर’ म्हणून निवडण्यात येतं.
लोकसभेत कमलनाथ यांचं नाव विरोधी पक्ष नेते म्हणूनही काँग्रेसच्या विचाराधीन आहे. तर संसदेच्या वरीष्ठ सभागृहात – राज्यसभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद विरोधी पक्षाचे नेते म्हणून काम पाहतील, अशी घोषणा याआधीच करण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.