केदारनाथ उद्ध्वस्त, पुरात हजारो बेपत्ता

गंगेच्या प्रकोपानं केदारनाथाचा संपूर्ण परिसर उध्वस्त केलाय. या प्रकोपापूर्वी केदारनाथचा परिसर घरं आणि दुकानांनी गजबजलेला होता. गंगेच्या प्रकोपानं मात्र हा सर्व परिसर जलमय झाला असून होत्याचं नव्हतं झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 19, 2013, 01:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, देहरादून
गंगेच्या प्रकोपानं केदारनाथाचा संपूर्ण परिसर उध्वस्त केलाय. या प्रकोपापूर्वी केदारनाथचा परिसर घरं आणि दुकानांनी गजबजलेला होता. गंगेच्या प्रकोपानं मात्र हा सर्व परिसर जलमय झाला असून होत्याचं नव्हतं झालंय. केदारनाथ हे शंकराचं महत्त्वाचं स्थान समजलं जातं. एप्रिल अखेर किंवा मेच्या सुरुवातीला केदारनाथचं दर्शन सुरू होतं आणि ऑक्टोबरला हे दर्शन बंद होतं. त्यामुळे याच पाच महिन्यांत केदारनाथला मोठ्या प्रमाणावर पर्यटक जातात.
`केदारनाथ`ची ओळख
> हिंदूचे पवित्र तीर्थस्थान आणि भाविकांचं आवडतं तीर्थक्षेत्र
> केदारनाथ मंदिर उत्तराखंड राज्यातील रूद्रप्रयाग जिल्ह्यात
> केदारनाथ मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक
> चारधाम मधील एक धाम तसंच पाच केदारमधील एक
> केदारनाथचं स्वयंभू शिवलिंग अति प्राचीन
> एक हजार वर्षांपूर्वी कत्यूरी शैलीत मंदिराची निर्मिती
> पांडवांचे वंशज जन्मजेयाकडून मंदिराची निर्मिती
> ३५६२ मीटर उंचावर मंदिर
> आदि शंकराचार्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला
> मंदिर परिसरात द्रौपदीसह पाच पांडवांची विशाल मूर्ती
> प्रतिकूल हवामानामुळं एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान दर्शनासाठी खुलं

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.