www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी १६ प्रश्नांची एक यादी घेऊन दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल गुजरातकडे रवाना झालेत. मात्र, परवानगी घेतली नसल्याचे कारण देऊन पोलिसांनी त्यांना सिमेवरच रोखले. त्यामुळे मोदींची भेट टळल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
मोदी यांना भेटण्यासाठी निघालेल्या केजरीवाल यांना पोलिसांनी रस्त्यातच थांबविले. पोलिसांनी मोदी यांच्या भेटीची आगाऊ वेळ घेण्यास केजरीवाल यांना सांगितले आहे. मोदी यांचा विकासाचा दावा हा खोटेपणा असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. विशेष म्हणजे मोदींची कुठलीही परवानगी न घेता ते भेट घेणार होते. मोदी गुजरातमध्ये विकासाचे जे दावे करतायत ते सर्व खोटे असल्याचंही त्यांनी म्हटले. तसंच मोदींच्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचारी मंत्री का आहेत असा प्रश्नही त्यांनी विचारला.
दरम्यान आम आदमी पार्टीनं गुजरात मध्ये केलेल्या रोड शोच्या निशेधार्थ आज भाजप कार्यकर्त्यांनी अहमदाबाद मध्ये आंदोलन केलंय या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी आप विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.