प्रथम मंदिर, मशीद आणि मग गुरुद्वारात जातात खुर्रम

सकाळी मंदिरमध्ये भाविकांना पाणी पाजल्यानंतर मशीदीत जाऊन सफाई आणि नंदर गुरूद्वारात लंगर खाऊ घालणे, हे झाल्यावरच रात्रीचे जेवण करणे ही दिनचर्या आहे मकनपूरमध्ये राहणाऱ्या मोहम्मद खुर्रम यांची. 

Updated: Oct 6, 2015, 09:42 PM IST
प्रथम मंदिर, मशीद आणि मग गुरुद्वारात जातात खुर्रम title=

मकनपूर : सकाळी मंदिरमध्ये भाविकांना पाणी पाजल्यानंतर मशीदीत जाऊन सफाई आणि नंदर गुरूद्वारात लंगर खाऊ घालणे, हे झाल्यावरच रात्रीचे जेवण करणे ही दिनचर्या आहे मकनपूरमध्ये राहणाऱ्या मोहम्मद खुर्रम यांची. 

मोहम्मद खुर्रम हे सकाळपासून रात्रीपर्यंत सर्व धर्मस्थळांना आपली सेवा देतात. ४५ वर्षीय खुर्रम धर्माने मुस्लिम आहे पण यांच्या सर्व धर्मांसाठी सेवाभाव आजही सर्व धर्मांसाठी एक आदर्श बनला आहे. 

या त्यांच्या कामात संपूर्ण कुटुंब त्यांना साथ देते. ते भाविकांना भंडारा आणि पाणी पाजण्याचे काम करतात. तसेच मंदिरात जाऊन प्रत्येक सण समारंभात सामील होतात. तसेच गुरूद्वारामध्ये होणाऱ्या प्रत्येक पर्वात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. तसेच धार्मिक स्थळांवर येणाऱ्या भाविकांना एकतेचा संदेशही देतात. 

फाळणी दुःखदायक 
खुर्रम यांनी सांगितले की, ते छोटे होते तेव्हा अब्बू आणि अम्मीकडून फाळणीबद्दल ऐकले होते. शाळेतही फाळणीबद्दल ऐकलं होतं. त्याचं दुःखही त्यांना वाटते होतं. तेव्हाच त्यांनी ठरविले की ते सर्व धार्मिक स्थळांवर जाऊन फाळणीच्या भावनेला दूर करण्याचा प्रयत्न करतील. त्यांनी सर्व धर्मांच्या पूजाघरात जाऊन स्वतःला जोडून घेतले आणि एकतेचा संदेश देणे सुरू केले. 

रोजा आणि उपवास 

खुर्रम हे मुस्लिम असले तरी ज्या भावनेने ते रोजा ठेवतात त्याच भावनने हिंदू धर्मातील उपवास पण ठेवतात. तसेच गुरूद्वारातील रथ यात्रेत झाडलोट करून यात्रा पूर्ण करतात. लंगरमध्ये जेवण तयार करतात आणि वाढण्याचे कामही करतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.