...आणि किरण बेदींना 'अश्रू' कोसळले!

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी बुधवारी  प्रचार दौऱ्यादरम्यान भावूक झालेल्या दिसून आल्या.

Updated: Feb 5, 2015, 09:58 AM IST
...आणि किरण बेदींना 'अश्रू' कोसळले! title=

दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी बुधवारी  प्रचार दौऱ्यादरम्यान भावूक झालेल्या दिसून आल्या.

कृष्णानगर विधानसभा मतदारसंघातील रोड शो दरम्यान किरण बेदींच्या डोळ्यांत अश्रू तरळले. जनतेनं दिलेल्या प्रेमामुळे आपण भारावून गेलो असल्याचं यावेळी किरण बेदी म्हणाल्या.  

एक कडक शिस्तप्रीय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या भाजपच्या उमेदवारांना असं अश्रू ढाळताना पाहून अनेकांच्या नजरा स्थिरावल्या. चहाचा फ्लास्क भेट देणाऱ्या लोकांचं प्रेम पाहून त्या भारावल्या होत्या. मला जे प्रेम मिळतंय, ते व्यक्त करण्यासाठी  माझ्याकडे शब्द नाहीत. मी लोकांच्या या प्रेमाची परतफेड करण्याचा जरुर प्रयत्न करेन. मी ईमानदारीनं लोकांची सेवा करेन, असं किरण बेदी यांनी यावेळी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.