'व्हॅलेन्टाईन डे'साठी हिंदू महासभेची जय्यत तयारी!

यंदाच्या व्हॅलेंटाईन्स डेसाठी हिंदू महासभेनं जय्यत तयारी केलीय. प्रेम व्यक्त करण्याच्या या दिवसानिमित्तानं हिंदू महासभेनं नवे डावपेच आखलेत. 

Updated: Feb 4, 2015, 01:01 PM IST
'व्हॅलेन्टाईन डे'साठी हिंदू महासभेची जय्यत तयारी! title=

नवी दिल्ली : यंदाच्या व्हॅलेंटाईन्स डेसाठी हिंदू महासभेनं जय्यत तयारी केलीय. प्रेम व्यक्त करण्याच्या या दिवसानिमित्तानं हिंदू महासभेनं नवे डावपेच आखलेत. 

या दिवशी वेगवेगळ्या धर्मांतील लोकांनी आपांपसांत विवाह केल्यास या विवाहांचं स्वागत करायचं ठरवलंय. मात्र यासाठी एक अटही घालण्यात आलीय. ती म्हणजे, इतर धर्मातील जोडीदाराला धर्म परिवर्तन करून हिंदू धर्मात प्रवेश करावा लागेल.

अखिल भारतीय हिंदू महासेभेचे राष्ट्रायी अध्यक्ष चंद्र प्रकाश कौशिक यांच्या म्हणण्यानुसार, 'मुस्लिम किंवा ख्रिश्चनची घर वापसी लग्नाच्या एक दिवस अगोदर केली जाईल. त्यामुळे, आम्ही जोडप्यांना आपल्या लग्नाची सूचना अगोदरच देण्यास सांगितलंय. त्यामुळे घरवापसीची आम्हाला तयारी करता येईल'.

हिंदू महासभेनं या दिवसासाठी 6 टीम्स तयार केल्यात. या टीम्सकडे वेगवेगळ्या जोडप्यांना या ऑफरची माहिती देण्याची जबाबदारी सोपवण्यात आलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.