कोलकता : पश्चिम बंगालमध्ये एक महिलेसोबत तिच्या घरच्यांनी असा काही प्रकार केला, त्याने मानवतेला मान शरमेने खाली घालावी लागली. सूनेला केवळ अमानुषपणे मारले नाही तर तिचे केसं कापून अर्धनग्न करून तिला संपूर्ण गावातून धिंड काढली.
सासरकडून झालेल्या शारीरिक आणि सामाजिक प्रतारणेनंतर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मानवतेला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना मालदह जिल्ह्यातील इंग्लिश बाजार ठाण्यातील इस्लामपूर गावात घडली.
शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेची पोलीस तक्रार दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पती अजगर शेख, सासरा मंजूर शेख तसेच सासू तयगरी बीबी यांच्या विरोधात प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी तिन्ही आरोपी फरार आहेत. प्राथमिक चौकशीनंतर असे लक्षात आले की, अजगर याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यावरून नेहमी भांडणं होत असत. अजगर आणि त्याच्या कुटुंबियांनी तिला दुसऱ्या व्यक्तिसोबत आपत्तीजनक अवस्थेत पाहिले असल्याचा आरोप लावण्यात येत आहे.
दुसरीकडे पीडित महिलेने सांगितले की, त्याच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध होते. विरोध केल्यावर त्यांनी अशी वागणूक दिली. पोलिस प्रकरणाची चौकशी करीत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.