नवी दिल्ली : काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 भारतीय जवानांना वीरमरण आले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पठाणकोट हल्ल्यानंतर झालेला हा मोठा हल्ला आहे.
या हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा सर्व स्तरातून मोठा निषेध व्यक्त केला जातोय.
हल्ल्यात शहीद झालेल्या कुटुंबियांकडूनही या हल्ल्याचा बदला घेतला जावा अशी मागणी केली जातेय. हल्ल्यात शहीद झालेले हवालदार अशोक सिंग यांच्या पत्नीने तर आम्हाला काही नको. केवळ माझे पती आणि 17 शहीद जवानांचा बदला हवाय अशी मागणी केलीये.
Kuch nhi chahiye,humko humare pati & 17 jawano ka badla chahiye- Wife of Havildar Ashok Singh who died in #UriAttack pic.twitter.com/7vIo4tfWJE
— ANI (@ANI_news) September 19, 2016