लालूंच्या अर्धवट इंग्रजीची संसदेत खिल्ली

राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या इंग्रजी बोलण्यावरून लोकसभेत जोरदार खसखस पिकली. ‘एअर होस्टेस’ ला एअर होस्टेज असा वारंवार उल्लेख केल्याने त्यांच्या इंग्रजी बोलण्याची खिल्ली उडविली गेली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 5, 2012, 04:26 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या इंग्रजी बोलण्यावरून लोकसभेत जोरदार खसखस पिकली. ‘एअर होस्टेस’ ला एअर होस्टेज असा वारंवार उल्लेख केल्याने त्यांच्या इंग्रजी बोलण्याची खिल्ली उडविली गेली.
संसदेत प्रश्नउत्तराच्या काळात अजित सिंह उत्तर देत होते. यावेळी मध्येच उठत लालूप्रसाद यांनी विमान मंत्रालयाबाबत प्रश्न उपस्थित केला. वैमानिक आणि एअर होस्टेस यांना पगार मिळत नसल्याबाबत चिंता व्यक्त केली. बिहारी भाषेत बोलण्याच्या नादात त्यांनी एअर होस्टेस ऐवजी एअर होस्टेज असा वारंवार उल्लेख केला. यावेळी मागच्या बाकावर बसलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लालूंची चूक हसतहसत दाखवून दिली. मात्र, लालूप्रसाद यांनी पुन्हा एअर होस्टेजचा उल्लेख केला. त्यामुळे लालूप्रसादच्या इंग्रजीची खिल्ली उडवली.
एअर होस्टज याचा मराठी अर्थ होतो, विमानमध्ये अपहरणकर्त्यांनी ओलिस धरलेला प्रवासी. त्यामुळे लालूंला एअर होस्टेसचा अर्थ बदल्याने संसदेत जोरदार खसखस पिकली.
दरम्यान, एफडीआयच्या मुद्द्यावर लालूप्रसाद यादव यांनी भाजपसाठी ‘जमुरे’ या शब्दाचा वापर केल्याने जोरदार हंगामा झाला. या शब्दावर जोरदार आक्षेप घेत तो शब्द कामकाजातून काढून टाकण्यात यावा, अशी मागणी काही खासदारांनी लोकसभेत केली. मात्र, हा शब्द असभ्य नाही तर तो खिलाडू वृत्तीचा आहे, असे जोरदार समर्थन लालूप्रसाद यांनी केले.