www.24taas.com, झी मीडिया, कोचीन
संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचं आज जलावतरण झालंय. यामुळे विमानवाहू युद्धनौका आखणाऱ्या आणि बांधणाऱ्या पहिल्या पाच देशांच्या समुहात भारताचा समावेश झालाय.
अमेरिका, युके, रशिया आणि फ्रान्स हे देश याआधी विमानवाहू युद्धनौका तयार करत होते. या यादीत आता भारताचा समावेश झालाय. ३७,५०० टन वजनाच्या या विमानवाहू नौकेचं लॉन्चिंग संरक्षणमंत्री ए. के. अँथनी यांच्या पत्नी एलिझाबेथ यांच्या हस्ते पार पडलं. या लॉन्चिंगमुळे पहिल्या फेजचं म्हणजे जहाजाच्या उभारणीचं काम पूर्ण झाल्याचं जाहीर होणार आहे. त्यानंतर या जहाजाला पुन्हा एकदा कोचिन शिपयार्डमधे आणलं जाईल. त्यानंतर त्यावर संरक्षण सामुग्रीची उभारणी केली जाणार आहे.
२०१६ मधे या जहाजाच्या विविध चाचण्या होतील आणि त्यानंतर २०१८ मधे ही नौका नौदलाच्या सेवेत रूजू होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.