लष्कर-ए-तोयबाचा मास्टरमाईंड अबू कासिमला भारतीय जवानांकडून कंठस्नान

लष्कर-ए-तोयबा काश्मीरमधला म्होरक्या अबू कासीमला कंठस्नान घालण्यात बीएसएफच्या जवानानां यश आलंय. दक्षिण काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत अबू कासीम मारला गेलाय. कुलगाममध्ये अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती सध्या पुढे येतेय.

Updated: Oct 29, 2015, 02:08 PM IST
लष्कर-ए-तोयबाचा मास्टरमाईंड अबू कासिमला भारतीय जवानांकडून कंठस्नान

श्रीनगर: लष्कर-ए-तोयबा काश्मीरमधला म्होरक्या अबू कासीमला कंठस्नान घालण्यात बीएसएफच्या जवानानां यश आलंय. दक्षिण काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत अबू कासीम मारला गेलाय. कुलगाममध्ये अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती सध्या पुढे येतेय.

कुलगाममध्ये पहाटे ४ वाजल्यापासून दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरु आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.


हाच तो अबू कासिम

कोण होता अबू कासिम पाहूया.... 

- अबु कासिम हा उधमपूरमधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. 
- उधमपूर हल्ल्यात जिवंत पकडलेला दहशतवादी नावेदला सर्व सूचना अबु कासिम यानंच दिल्या होत्या. 
- एनआयएही गेल्या अनेक दिवसांपासून कासिमच्या शोधात होती.
- कासिम हा गेल्या १० वर्षांपासून दक्षिण काश्मीरमधील दहशतवादी कृत्यांमध्ये सक्रीय होता. 
- त्याच्यावर २० लाखांचं बक्षीसही जाहीर झालं होतं. 
- लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा तो डिव्हिजनल कमांडर होता.  
- जम्मू-काश्मीरमधील सर्व दहशतवादी कृत्य कासिमच्याच नेतृत्त्वात व्हायच्या, अशीही माहिती मिळते आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.