सोन्याचे भाव हलक्यानंच चढले...

नफा वसुलीच्या दबावामुळे मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समध्ये सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. स्टॉकिस्टनं केलेल्या सिमित लिलावाचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून आला.

Updated: Jul 29, 2014, 11:55 AM IST
सोन्याचे भाव हलक्यानंच चढले...  title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : नफा वसुलीच्या दबावामुळे मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समध्ये सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. स्टॉकिस्टनं केलेल्या सिमित लिलावाचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून आला.

दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचे भाव 20 रुपयांनी वधारून 28,370 रुपये प्रति दहा ग्राम होता. तर लिलावात थोडंसं समर्थन मिळाल्यानं चांदीचे भाव पूर्वस्तरावर म्हणजेच 44,800 रुपये प्रति किलोवर स्थिर राहिले.  

घरच्या बाजारता सोनं 99.0 आणि 9.5 शुद्धचे भाव 20 रुपयांच्या तेजीनं 28,370 रुपये आणि 28,170 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाले. 

आयातदारांच्या आणि बँकांच्या डॉलरच्या मागणीमुळे सोमवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांत 3 पैशांची घसरण झाली. आणि रुपया एका आठवड्याच्या निम्न स्तरावर म्हणजेच 60.13 रुपये प्रति डॉलरवर बंद झाला.  

सोमवरी, सेन्सेक्स 135.52 अंकांनी कोसळून एका आठवड्यातील सर्वात निम्न स्तरावर बंद झाला. निफ्टीमध्येही घसरण दिसून आली आणि निफ्टी 7,748.70 अंकांवर बंद झाला. धातू, तेल, गॅस आणि रिअॅलिटी शेअरमध्ये नुकत्याच दिसून आलेल्या तेजीनंतर गुंतवणुकदारांनी केलेल्या विक्रीमुळे हा परिणाम जाणवला.

आशियातील बाजारात चीन, हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरियाच्या बाजारांमध्ये घसरण दिसून आली. तर तैवानच्या बाजारात 0.20 टक्के घट नोंद करण्यात आली.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.