लव, मॅरेज आणि हनीमूननंतर घर लुटले!

आपण फसवणुकीचे अनेक प्रकार पाहिले असतील, पण पहिल्यांदा प्रेम, मग निकाह आणि दुसऱ्या रात्री पूर्ण घर सफाटच केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 18, 2013, 05:42 PM IST

www.24taas.com, अमरोहा
आपण फसवणुकीचे अनेक प्रकार पाहिले असतील, पण पहिल्यांदा प्रेम, मग निकाह आणि दुसऱ्या रात्री पूर्ण घर सफाटच केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. छत्तीस तासांपूर्वी लग्न झालेला पती आपल्या पत्नीला पोलिसांनी पकडावे यासाठी पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करून बसला आहे.
हे प्रकरण दोन दिवसांपूर्वीचे आहे. अमरोहातील पंछइंया भागातील एका घरात भाड्याने खोली घेऊन एका मुलीने शेजारी राहणाऱ्या शब्बूला प्रेमाच्या जाळात अडकवले. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर एकटा पडलेल्या शब्बू त्या मुलीच्या प्रेमात आकंठ बुडला. दोघांनी जीवन-मरणाच्या आणाभाका खाल्ल्या. या वयाने मोठ्या असलेल्या शब्बूने आपल्या परिवाराला कसेबसे समजावले आणि त्या प्रमाणे दोन दिवसांपूर्वी दोघांचे लग्न झाले.
शेजाऱ्यांनी लग्नाच्या पंगतीत हजेरी लावली. पंगती उठल्या आणि भाड्याच्या घरातून मुलीची पाठवणी झाली.
छत्तीस तासांपूर्वी झालेली आपली पत्नी गायब आहे. कपाट आणि बॅग उघडी पाहून प्रकार त्याच्या लक्षात आला. ही महिला २६ हजार रोख, चार तोळे सोनं आणि कपडे घेऊन रफूचक्कर झाली. या महिलेने असे लग्न करून अनेकांना फसवले असल्याचे पोलिसांनी सांगितले.