जोडप्याला रंगेहाथ पकडलं; जबरदस्तीनं लग्न लावलं

एक तरुण आणि एक तरुणीला एका हॉटेलच्या रुममध्ये रंगेहाथ पकडल्यानंतर पोलिसांनी या दोघांचं लग्न लावून दिलंय. ही धक्कादायक घटना घडलीय बिहारमध्ये... इथं पोलिसांनी लव्हबर्डसची जबरदस्तीनं लग्नं लावून देण्याचा धडाकाच लावलाय. 

Updated: Jul 3, 2014, 07:33 PM IST
जोडप्याला रंगेहाथ पकडलं; जबरदस्तीनं लग्न लावलं title=

पाटणा : एक तरुण आणि एक तरुणीला एका हॉटेलच्या रुममध्ये रंगेहाथ पकडल्यानंतर पोलिसांनी या दोघांचं लग्न लावून दिलंय. ही धक्कादायक घटना घडलीय बिहारमध्ये... इथं पोलिसांनी लव्हबर्डसची जबरदस्तीनं लग्नं लावून देण्याचा धडाकाच लावलाय. 

संबंधित तरुणी आणि तरुणानं खोटी ओळखपत्र दाखवून एका हॉटेलचा रुम बूक केला होता. हे दोघे एकांतात वेळ व्यतीत करत असतानाच पोलिसांनी इथं छापा मारला आणि त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं... आणि त्यानंतर पोलिसांनी या जोडप्याचं जवळच्याच एका मंदिरात जबरदस्तीनं लग्नही लावून दिलं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित हॉटेलमध्ये घरातून पळालेलं एक जोडपं शोधण्याच्या हेतून छापा मारला होता. त्या दरम्यान हे जोडपं पोलिसांच्या हाती लागलं. त्यांनी खोटी ओळखपत्र दाखवून रुम बूक केला होता. इतंकच नाही तर त्यांनी आपण एकमेकांचे पती-पत्नी असल्याचंही सांगितलं होतं.  

संबंधित तरुण अमरपूर जिल्ह्याचा रहिवासी असून तो भारतीय रेल्वेचा कर्मचारीही आहे... तर मुलगी झारखंडच्या गोड्डा जिल्ह्याची रहिवासी आहे. ती पदवी शिक्षण घेतेय. सोबतच, पोलिसांना असंच आणखी एक जोडपंही इथं आढळलं.  

छापा मारल्यानंतर पकडले जाऊ नये, आणि आरोपांतून वाचण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे लग्न... असं त्यांना सांगण्यात आलं... आणि  दोन्ही जोडप्यांचं लग्न हिंदू पद्धतीनं पोलीस स्टेशनच्या अगदी समोरच्या अन्नपूर्णा मंदिरात लावण्यात आलं. या लग्नात दोन्ही जोडप्याच्या कुटुंबातील काही व्यक्तींही उपस्थित होते.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.