नवी दिल्ली: नियोजन आयोगाचं नामकरण करण्यात आलंय. आता नियोजन आयोगाचं नाव 'नीती आयोग' करण्यात आलंय. केंद्र सरकारकडून याची माहिती देण्यात आलीय.
लवकरच पंतप्रधान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावून नीती आयोगाची रुपरेषा ठरवणार आहे.
कसा असेल नीती आयोग ?
- पंतप्रधान या नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतील आणि उपाध्यक्ष हा त्याचा कार्यकारी प्रमुख असेल.
- याखेरीज सरकारमधील आणि सरकारच्या बाहेरील तज्ज्ञांची आयोगावर वेळोवेळी सदस्य म्हणून नेमणूक केली जाईल.
- आंतरराज्य परिषद, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर (डीबीटी)
- युनिक आयडेंटिटी अॅथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय-आधार) आणि कार्यक्रम मूल्यमापन शाखा असे या आयोगाचे चार प्रमुख विभाग असतील.
- प्रत्येक विभागाच्या प्रमुखपदी सचिव दर्जाचा अधिकारी असेल.
- नव्या पंचवार्षिक योजना तयार करणे आणि आधीच्या योजनांच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन करणे हे काम पूर्वीच्या नियोजन आयोगाप्रमाणे नवा नीती आयोगही करेल.
- मात्र केंद्रीय निधीचे राज्यांना प्रत्यक्ष वितरण करण्याचे काम नवा आयोग न करता ते काम वित्त मंत्रलय करेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.