www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
सज्ञान स्त्री पुरुषांच्या संबंधाबद्दल मद्रास हायकोर्टानं आज एक महत्वपूर्ण निकाल दिलाय सज्ञान स्त्री पुरुषांनी परस्परसंमतीने विवाह पूर्व शरीर संबध ठेवले तर तो कायदेशीर विवाहच आहे असा ऐतिहासीक निकाल मद्रास हायकोर्टानं दिलाय.
विवाहपूर्व शरीरसंबध ठेवणा-या स्त्री पुरुषांना पती पत्नीच समजलं गेलं असही याचिकेदरम्यान हायकोर्टानं सांगितलंय. कोईम्बतूर फॅमिली कोर्टाच्या एका निर्णयावर अपीलावेळी हा महत्वाचा निकाल दिलाय. मंगळसूत्र बांधणे किवा विवाहाची नोंदणी करणं या गोष्टी केवळ समाजाच्या समाधानासाठी असतात असंही कोर्टानं आपल्या निकालात नमूद केलंय.
या निर्णयामुळे आता तरुणांच्या शरीर संबंधांबाबत आणखी एका नव्या चर्चेला तोंड फुटणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.