दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदनालाही वादाचं गालबोट

देशभरात ६६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा होत असताना, महाराष्ट्र सरकारनं आपलं नाक कापून घेतलं. महाराष्ट्र सरकारच्या कार्यक्रमात आज चक्क ६५ वा प्रजासत्ताक दिन असल्याचा उल्लेख होता. हे कमी झालं म्हणून की काय, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदन सोहळ्यालाही वादाचं गालबोट लागलं.

Updated: Jan 26, 2015, 06:54 PM IST
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदनालाही वादाचं गालबोट title=

नवी दिल्ली: देशभरात ६६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा होत असताना, महाराष्ट्र सरकारनं आपलं नाक कापून घेतलं. महाराष्ट्र सरकारच्या कार्यक्रमात आज चक्क ६५ वा प्रजासत्ताक दिन असल्याचा उल्लेख होता. हे कमी झालं म्हणून की काय, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदन सोहळ्यालाही वादाचं गालबोट लागलं.

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्र सरकारनं आपली पुरती शोभा करून घेतली. देशभरात ६६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. मात्र शिवाजी पार्कवर आयोजित महाराष्ट्र सरकारच्या सोहळ्यात ६५ वा प्रजासत्ताक दिन असा उल्लेख करण्यात आला. एकीकडं भारतीय प्रजासत्ताक महासत्ता होण्याच्या दिशेनं दमदार पावलं टाकत असताना, महाराष्ट्र सरकारचं असं एक पाऊल मागे पडलं.

ही नाचक्की कमी झाली म्हणून की काय, दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातल्या झेंडावंदनाच्या सोहळ्याला निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी चक्क दांडी मारली. तर राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्रा यांनीही सोहळ्याकडे पाठ फिरवली. अखेर कर्मचाऱ्यांनाच झेंडा वंदनाचा कार्यक्रम उरकून घ्यावा लागला. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या प्रजासत्ताक दिनाबाबत सरकारी अधिकाऱ्यांची बेपर्वाईच यातून दिसून आली. अशा बेपर्वा अधिकाऱ्यांवर सरकार कडक कारवाई करणार की त्यांच्या चुकांवर पुन्हा पांघरूण घालणार?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.