कर्ज प्रक्रिया सुलभ करा : आरबीआय

सामान्यांना कर्ज देताना त्यांच्या अर्जांचा प्राधान्याने विचार करा. त्यांना जास्तीच्या कागदपत्रांचा तगादा लावू नये, असे स्पष्ट निर्देश देताना कर्ज प्रक्रिया सुलभ करण्याचे भारतीय रिझर्व्ह बॅंकेने बजावले आहे.

Updated: Jan 29, 2015, 09:53 AM IST
कर्ज प्रक्रिया सुलभ करा : आरबीआय title=

नवी दिल्ली : सामान्यांना कर्ज देताना त्यांच्या अर्जांचा प्राधान्याने विचार करा. त्यांना जास्तीच्या कागदपत्रांचा तगादा लावू नये, असे स्पष्ट निर्देश देताना कर्ज प्रक्रिया सुलभ करण्याचे भारतीय रिझर्व्ह बॅंकेने बजावले आहे.

कर्ज घेताना ग्राहकांना येणाऱ्या अडचणींची दखल भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना कर्ज प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रामुख्याने नगरपालिका, नगरपरिषद आणि त्या खालील नागरी भागातील नागरिकांनी कर्जासाठी अर्ज केल्यास त्यांचा प्राधान्याने विचार करण्याचा सल्ला दिलाय.

ग्रामीण भागात कर्ज मिळविण्यासाठी कर्जदाराला काहीशा अधिक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. प्रामुख्याने संबंधित व्यक्तीचे जर पतसंस्था अथवा सहकारी सोसायटीचे काही कर्ज असले तर त्या कर्जाची परतफेड केल्याचे ‘नो ड्यू’ प्रमाणपत्र (कोणतीही शिल्लक नाही) देण्याचा तगादा बँकांतर्फे लावला जातो. तो लावू नये, असे आरबीआयने म्हटलेय.

नो ड्यू ऐवजी संबंधित ग्राहकाकडून स्वत:हून (स्वसांक्षाकित) माहिती घ्यावी. तसेच त्या ग्राहकाची आणखी काही माहिती हवी असल्यास ग्राहकाला त्रास न देता स्वत:च्या पातळीवर अन्य पर्यायांच्या माध्यमातून मिळवावी, असे शिखर बँकेने स्पष्ट केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.