नवी दिल्ली : यू.जी.सी. म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने आता पुरूष आणि विद्यार्थी हे लैंगिक छळ संदर्भात तक्रार नोंदवू शकतात, असे नोटीफिकेशन जाहीर केले आहे.
अत्तापर्यंत पुरूषांचे लैंगिक छळ होत असल्यास ते तक्रार नोंदवू शकत नव्हते. मात्र यू.जी.सी.च्या या निर्णयाने पुरूषांनाही समान अधिकार मिळणार आहेत.
यू.जी.सी.ने काढलेल्या नोटीफिकेशन प्रमाणे लैंगिक छळ हा फक्त एकाच लिंगाशी संबधित असू शकत नाही. कोणत्याही लिंगासोबत लैंगिक छळ होऊ शकतो. त्यामुळे आता महाविद्यालयांना किंवा कोणत्याही संस्थांना जर कोणा पुरूषाने लैंगिक छळ संदर्भात तक्रार केली असेल तर त्यावर योग्य ती कारवाई करावी लागेल.
यू.जी.सी.ने काय म्हटलंय आदेशात
१. लैंगिक छळ संदर्भात त्रयस्त व्यक्तीसुद्धा तक्रार नोंदवू शकते.
२. नातेवाईक, मित्रदेखील तक्रार नोंदवू शकतात.
३. पिडित व्यक्तीने तीन महिन्यांच्या आत तक्रार नोंदवावी.
४. प्रत्येक संस्थेत एक तक्रार समिती असावी.
५. या समितीने ९० दिवसांच्या आत कारवाई पूर्ण करावी.
६. आरोपी आढळल्यास त्या व्यक्तीला महाविद्यालयातून निलंबित करण्यात यावे.
७. शिक्षक दोषी आढळल्यास त्यांच्यावर सेवा नियमांनुसार कारवाई करावी.
८. चुकीचे आरोप केल्यास दंड आकारण्यात यावा.
२००७ साली यू.जी.सी.समोर अशा अनेक तक्रारी आल्या ज्यामध्ये पुरूषांवर लैंगिक छळ झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. २००७मध्ये दिल्ली विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी शिक्षकांविरोधात लैंगिक छळ केल्याच्या तक्रारी केल्या होत्या.