जयपूर : राजस्थानच्या उद्यपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलीये. मेव्हणीशी लग्न करता यावे म्हणून चक्क त्या व्यक्तीने तिच्या पतीचीच हत्या केलीये.
३२ वर्षीय अजय साहूला त्याची मेव्हणी मीना जैनशी लग्न करायचे होते. मात्र मीनाचे लग्न संतोष जैनशी झाले. मात्र त्यानंतर अजयचे मीनाप्रती प्रेम कमी झाले नाही. तिला मिळवण्याची त्याची इच्छा कायम होती.
अजयला माहीत होते की जोपर्यंत मीनाचा पती संतोष जिवंत आहे तोपर्यंत त्याचे मीनलशी लग्न होऊ शकणार नाही. त्यामुळे त्याने संतोषलाच मारण्याचा प्लान बनवला.
अजय संतोषला भेटला. त्यानंतर या दोघांनी भरपूर दारु प्यायली. तेथून अजय संतोषला निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला. तेथे त्याने आपला ठरवलेल्या प्लानप्रमाणे संतोषला गळा आवळून ठार केले.
या घटनेनंतर अजयष फरार होता. अखेर पोलिस तपासादरम्यान अजयचा ठावठिकाणा लागला. याप्रकरणी अजयला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.