कोचीन : वयाची सहा दशकं ओलांडलेल्या एका माणसानं मृत्यूलादेखील चकवा दिलाय.
आपल्या नातवाबरोबर क्रिकेट खेळत असताना कोचीनमध्ये राहणाऱ्या अजीत यांना अचानक छातीत दुखू लागलं. सलग चार तास हे दुखणं सुरूच होतं. परंतु, त्यांना यावर फारसं लक्ष दिलं नाही.
धुम्रपानाची सवय असणाऱ्या अजीत यांनी त्रास वाढल्यानंतर हॉस्पीटल गाठलं. इथं त्यांचा ईसीजी करण्यात आला तेव्हा त्यांना हार्ट अटॅक आल्याचं समजलं.
लगातार अटॅक आल्यानं त्यांच्या हृदयानं अनेकदा काम करणंही बंद केलं होतं. हे प्रकरण गंभीर होतं त्यामुळे डॉक्टरांनी अजीत यांना तातडीनं मोठ्या हॉस्पीटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला.
चार तासांत २३ वेळा अजीत यांना हार्ट अटॅक आला होता. स्टेन्टिंग करून डॉक्टरांनी अजीत यांच्या हृदयाचे ब्लॉक हटवलेत. अजीत यांची प्रकृती आता स्थिर आहे.
डॉ. अनिल कुमार यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या संपूर्ण मेडीकल करिअरमध्ये अशी घटना त्यांनी पहिल्यांदाच पाहिलीय.