www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आम्ही अनेक देश हिताचे निर्णय घेतले आहेत. मला कधीही राजीनामा द्यावासा वाटला नाही. मात्र, चार राज्यांतील निवडणुकीतील पराभवाला महागाई कारणीभूत ठरू शकते. मी नवीन व्यक्तीला पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितो. राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहेत, असे मत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. यावरून त्यांनी पंतप्रधान पद सोडण्याची तयारी दाखवून दिली आहे.
आम्ही चार राज्यांतील पराभवाचा विचार केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जोमाने काम करून चांगला रिझल्ट पाहायला मिळेल. मला तिसऱ्यांदा पंतप्रदान पद नको असे सांगून आगामी निवडणुकांनतर पंतप्रधानपद सोडणार असल्याचं पंतप्रधान यांनी जाहीर केले. पंतप्रधान सिंग यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन यूपीएच्या कार्यकाळावर भाष्य केलं.
मोदी देशासाठी घातक
नरेंद्र मोदींचे नेतृत्व देशासाठी धोकादायक ठरेल. मोदी यांच्या सारखी व्यक्ती पंतप्रधान होणे हे देशासाठी घातक आहे. देश बरबाद होईल, अशी प्ररखर टीका पंतप्रधान सिंग यांनी मोदींवर केली.
आम्ही देश विकासाची आणि हिताची कामे केली आहेत. मात्र, अर्थव्यवस्थेच्यादृष्टीने आगामी काळ महत्वाचा आहे. पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत चांगले मतदान झाले. आम्हाला चार राज्यात जनतेने नाकारले, याचा आम्ही स्वीकार केला आहे. मात्र, आम्ही बोध घेतला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्याची झलक पाहायला मिळेल.
देशाने गेल्या नऊ वर्षात सर्वोच्च विकासदर गाठला आहे. काँग्रेसच्या काळात देश विकासाची आणि हिताची कामे झाली आहेत. आम्ही सर्व वर्गाचा विकास केला आहे. देशातील दारिद्र्य रेषेखालील गटाची संख्या घटली आहे. तर शेती उत्पादन दरात वाढ झाल्याने महागाईत वाढ झाल्याचे पंतप्रधान यांनी म्हटले.
काँग्रेसच्या काळात अनेक महत्वाचे कायदे संमत झाले. यूपीएच्या काळात देशाच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाली. मात्र महागाई रोखण्यातही सरकार अपयशी ठरलं. तसंच अपेक्षित रोजगार निर्मिती झाली नसल्याची कबुली पंतप्रधान सिंग यांनी दिली.
भाषणातील ठळक मुददे
मी नवीन व्यक्तीला पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितो - डॉ. मनमोहन सिंग
- नरेंद्र मोदी यांच्यासारखे पंतप्रधान होणे देशासाठी घातक
- युपीएलाच बहुमत मिळाणार
- गेल्या ९ वर्षात भारताचा विकासदर सर्वोच्च
- दारिद्र्यरेषे खालील लोकांची संख्या गेल्या ९ वर्षांत कमी झाली आहे
- शेतक-यांच्या मालाला योग्य भाव दि्ल्याने अन्न-धान्य आणि भाजीपाल्याच्या किंमती वाढल्या
- भारत संरक्षण आणि लष्कराच्या खर्चात वाढ करेल
-भ्रष्टाचारावर माध्यमांनी विरोधीपक्षांची साथ दिली
-अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पुढील काळ महत्त्वाचा
-आंतरराष्ट्रीय मंदीचा भारतावर परिणाम नाही
- जेव्हा जेव्हा गरज पडली त्यावेळी मी आवाज उठवला आहे
- मित्र, कुटुंबीयांसाठी पदाचा वापर केला नाही
- यापुढं योग्य भूमिका मांडत राहीण
- `पार्टी फोरम`मध्ये मी माझी नेहमी मतं मांडीत आलो आहे
- मी प्रामाणिकपणे काम करीत आलो आहे
- मी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही
- कोर्ट आणि मीडियामुळे भ्रष्टाचार समोर आला
- युपीए-१च्या काळाज सर्वाधिक भ्रष्टाचार
- गेल्या १० वर्षांत अनेक चढ उतार पाहिले आहेत
- चार राज्यांतील निवडणुकीला महागाई कारणीभूत ठरू शकते
- आम्ही अनेक देश हिताचे निर्णय घेतले
- मला कधीही राजीनामा द्यावासा वाटला नाही
- राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार
- पंतप्रधान पद सोडण्याची डॉ. मनमोहन सिंग यांची तयारी
- पंतप्रधान पद उमेदवाराची घोषणा योग्यवेळी करणार
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.