विवाहीत मुलीलाही वडिलांच्या जागी नोकरी मिळण्याचा हक्क

सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीचा नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास, त्याच्या जागी त्याच्या मुलीलाही नोकरी मिळू शकते... यासाठी मुलगी अविवाहीतच असावी अशी काही अट नाही तर विवाहीत मुलीलाही वडिलांच्या जागी नोकरी मिळवण्याचा हक्क आहे, असा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयानं दिलाय. 

Updated: May 8, 2015, 07:36 PM IST
विवाहीत मुलीलाही वडिलांच्या जागी नोकरी मिळण्याचा हक्क  title=

चेन्नई : सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीचा नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास, त्याच्या जागी त्याच्या मुलीलाही नोकरी मिळू शकते... यासाठी मुलगी अविवाहीतच असावी अशी काही अट नाही तर विवाहीत मुलीलाही वडिलांच्या जागी नोकरी मिळवण्याचा हक्क आहे, असा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयानं दिलाय. 

एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं हे स्पष्ट केलंय. परंतु, सोबतच न्यायालयानं यासाठी दोन अटीही घातल्या आहेत. या स्थितीत मुलीला तिच्या भाऊ आणि बहिणींकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवावं लागेल. तसेच तिच्या पतीकडूनही अंडरटेकिंग द्यावं लागेल की, या नोकरीतून मिळालेल्या पगारातून मुलीला आपल्या आई - वडिलांच्या पालन-पोषणाची जबाबदारी घ्यावी लागेल. 

हा निर्णय न्यायाधीश सतिश अग्निहोत्री आणि न्यायाधीश एम वेणूगोपाल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. ते कायलविझी या महिलेच्या प्रकणाची सुनावणी करत होते.  या प्रकरणात कायलविझीचे वडील व्ही. इंद्रजीत यांचे निधन झाले होते. ते शिक्षण खात्यात नोकरीला होते. वडिलांच्या मृत्यूनंतर कायलविझींना त्यांच्या वडिलांच्या जागी नोकरीवर ठेवण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी न्यायलयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला. 

या प्रकरणावर सुनावणी करताना खंडपीठानं दिलेल्या निर्णयानुसार, 'विवाहीत मुलीला वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी नोकरी मिळू शकते त्यासाठी कुटुंबातील अन्य सदस्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागेल तसंच आपल्या पगारातून आई-वडिलांच्या पालन-पोषणाची जबाबदारी स्विकारावी लागेल'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.