वडिलांच्या जागी विवाहित मुलीलाही नोकरी

वडिलांच्या जागेवर नोकरी प्राप्त करण्यासाठी मुलगी अविवाहितच असायला हवी, असा कोणताही नियम नाही. त्या व्यक्तीला जर मुलगा नसेल, केवळ मुलगीच असेल आणि तिचाही विवाह झाला असेल, तरीदेखील ती आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी नोकरी प्राप्त करू शकते, असे न्यायालयाने एका प्रकरणी दिलेल्या आपल्या निकालात स्पष्ट केले आहे.

Updated: May 12, 2015, 10:53 PM IST
वडिलांच्या जागी विवाहित मुलीलाही नोकरी title=

चेन्नई : वडिलांच्या जागेवर नोकरी प्राप्त करण्यासाठी मुलगी अविवाहितच असायला हवी, असा कोणताही नियम नाही. त्या व्यक्तीला जर मुलगा नसेल, केवळ मुलगीच असेल आणि तिचाही विवाह झाला असेल, तरीदेखील ती आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी नोकरी प्राप्त करू शकते, असे न्यायालयाने एका प्रकरणी दिलेल्या आपल्या निकालात स्पष्ट केले आहे.

सरकारी सेवेत असलेल्या व्यक्तीचा जर निवृत्तीपूर्वीच मृत्यू झाला, तर त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरी करण्याचा अधिकार त्या व्यक्तीच्या विवाहित मुलीचाही असतो, असा महत्त्वाचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.

वडिलांच्या जागेवर नोकरी प्राप्त करण्यासाठी मुलगी अविवाहितच असायला हवी, असा कोणताही नियम नाही. त्या व्यक्तीला जर मुलगा नसेल, केवळ मुलगीच असेल आणि तिचाही विवाह झाला असेल, तरीदेखील ती आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी नोकरी प्राप्त करू शकते, असे न्यायालयाने एका प्रकरणी दिलेल्या आपल्या निकालात स्पष्ट केले आहे.

मुलीला वडिलांच्या जागी नोकरी मिळवण्यासाठी दोन अटीही घातल्या आहेत. त्या मुलीला भाऊ आणि बहीण असेल, तर तिला या नोकरीकरता त्यांच्याकडून 'ना हरकत' प्रमाणपत्र मिळवावे लागेल.

तसेच, या नोकरीतून मिळणाऱ्या पगारातून केवळ आपल्या आई आणि लहान भावडांच्याच पालन-पोषणाची माझी जबाबदारी राहील, असे शपथपत्र तिला आपल्या पतीकडूनही प्राप्त करावे लागेल, असे न्या. सतीश अग्निहोत्री आणि न्या. एम. वेणुगोपाल यांच्या खंडपीठाने निकालात म्हटले आहे.

या प्रकरणात कायलविझी असे नाव असलेल्या महिलेचे वडील व्ही. इंद्रजीत यांचे निधन झाले होते. ते शिक्षण खात्यात नोकरीला होते. वडिलांच्या मृत्यूनंतर कायलविझी यांना वडिलांच्या जागी नोकरी देण्यास शिक्षण मंडळाने नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने उपरोक्त निकाल दिला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.